‘धनगड’ की ‘धनगर’; उच्च न्यायालयात १० एप्रिलपासून सुनावणी सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ एप्रिल २०२३ । जळगाव । राज्यातील एस.टी.आरक्षपासून वंचित असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे, यावर मुंबई उच्च न्यायालयात दि.१० एप्रिलपासून सलग चार दिवस सुनावणी होणार असल्याची माहिती महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे महासचिव डॉ.जे.पी.बघेल व कायदेशीर सल्लागार मुरार पाचपोळ यांनी येथे दिली.

काळेकर समितीने १९५६ मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात ‘धनगड’ जातीचा उल्लेख निर्माण झाला आहे. एवढ्याच पुराव्याच्या आधारावर राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. वास्तविकता आरक्षण देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या देशातील एकाही संस्थेकडे ‘धनगड’ संवर्गातील घटक राज्यात वास्तव्यास असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे गेल्या दशकापासून यासंदर्भात पुरावे जमा करुन मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दि.१० ते १३ एप्रिलदरम्यान सलग सुनावणी होणार असल्याची माहिती बघेल व पाचपोळ यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी मंचचे जिल्हाध्यक्ष प्रा.शामकांत वर्डीकर, राज्य संघटक चंद्रशेखर सोनवणे, सचीव सुधाकर शेळके, जिल्हा सचीव भिकनराव पेंढारकर यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!