धनंजय शितोळे यांचा सत्कार करताना नंदकुमार मोरे व मान्यवर.(छाया : समीर तांबोळी)
स्थैर्य, कातरखटाव, दि. २५ : निमसोड (ता. खटाव) येथील सोनारसिध्द वि.का.स.सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी धनंजय मुगुटराव शितोळे तर उपाध्यक्षपदी श्रीमती सुशिला बबन मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यापूर्वीच्या पदाधिकार्यांनी पार्टीअंतर्गत समझोत्यानुसार राजीनामे दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व युवा नेते नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत या निवडी करण्यात आल्या.
अध्यक्ष पदासाठी शामराव मोरे यांनी शितोळे यांचे नांव सुचविले त्यास तुकाराम घाडगे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी मुरलीधर रामहरी मोरे सुचक तर दादासाहेब कदम अनुमोदक होते. या बैठकीस मुरलीधर मोरे, गणेश घाडगे, सागर बरकडे, गोरख चव्हाण, विजय भादुले, चंद्रकांत सुतार, बाबासाहेब जाधव, अशोकराव मोरे, तानाजी शेळके, दादा कांबळे उपस्थित होते.
संस्थेचे सचिव दिलीप घाडगे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. नंदकुमार मोरे यांनी नुतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या तर मावळत्या पदाधिकार्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले. शितोळेनगरला दुसर्यांदा सोसायटीला संधी दिल्याबद्दल अध्यक्ष धनंजय शितोळे व इतर नागरीकांनी पार्टीप्रमुख नंदकुमार मोरे तसेच इतर सहकार्यांना धन्यवाद दिले.