धनंजय मुंडे यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


स्थैर्य, मुंबई, दि. 12 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील ते तिसरे मंत्री ठरले आहेत. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि सरकारमधले अनेक मंत्री हे क्वारंटाइन झाले आहेत. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे हे उपस्थित होते. यानंतर अनेक अधिकारी आणि मंत्री हे स्वतःची कोरोना चाचणी करुण घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांना आधीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी उपचार घेत कोरोनावर मात केली आहे. आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!