बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने धम्मदिक्षा सोहळा संपन्न


स्थैर्य, मुंबई, दि. ११: “बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, मुंबई विभाग” या संस्थेच्या विद्यमाने मा. सिध्दार्ध पवार यांच्या अध्यक्षतेखाली बौद्धधम्म दिक्षा समारंभ अंकुर बुद्धीविहार नायगाव येथे सरकारी नियमांचे पालन करून संपन्न झाला.

वसई येथील रुबी फिलिक्स घोन्सालवीस यांनी ख्रिस्ती धर्माचा त्याग करून संस्थेचे मा. विश्वस्त रामदास धो. गमरे, कार्याध्यक्ष दिपक मोहीते, उपाध्यक्ष सुरेश पवार, सरचिटणीस संजय तांबे, विभाग अध्यक्ष अजय जाधव, शाखा क्रमांक ११ पाट पन्हावेचे अध्यक्ष नितीन कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बोद्धधम्माची दिक्षा घेतली.

आदर्श बौद्धाचार्य संस्कार अध्यक्ष मा. संदिप गमरे, सचिव मनोज पवार यांनी त्रिशरण पंचशिल व २२ प्रतिज्ञा देऊन रुबी घोन्सालवीस यांस धम्मदिक्षा दिली, त्यावेळेस उपस्थित मान्यवरांनी मंगलकामना व्यक्त करीत रुबी घोन्सालवीस यांना शुभेच्छा देत, संघाच्या वतीने प्रमाणपत्र देवून सन्मानित केले. त्यानंतर रुबी घोन्सालवीस शाखा क्रमांक ११ पाटपन्हावे शाखेचे सभासद दिवंगत शांताराम लक्ष्मण कदम यांचे चि. सुबोध कदम यांच्या सोबत बोद्ध पद्धतीने विवाहबद्ध झाल्या.


Back to top button
Don`t copy text!