दोन्ही देशांमध्ये डीजीएमओ स्तरावरील चर्चा; नियंत्रण रेषा, जुन्या करारावर चर्चेत सहमती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २५: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध गेल्या अनेक वर्षापासून चांगले नव्हते. परंतु, आता पुन्हा एकदा हे संबंध सुधारण्याचे संकेत दिसू लागले आहे. कारण, भारत आणि पाकिस्तानदरम्यान डीजीएमओ लेव्हल अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी पार पडली. दोन्ही देशात यापुर्वी वेळोवेळी स्वाक्षऱ्या झालेल्या सर्व करारावर 24-25 फेब्रुवारी रात्री अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले.

डीजीएमओ स्तरावर झालेल्या या बैठकीत हॉटलाईनवर चर्चा करताना युद्धबंदीचे उल्लंघन, युद्धबंदी, काश्मीर प्रकरणासह अनेक करारांवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला, नंतर संयुक्त निवेदन जारी केले.

संबंध सुधारण्यासाठी 3 मुद्द्यावर लक्ष

– दोन्ही देशात वेळप्रसंगी चर्चा करण्यासाठी हॉटलाईन कॉन्टॅक्ट मॅकेनिजम तयार करण्यात येणार आहे. – सीजफायर उल्लंघन, गोळीबार आणि घुसखोरीसारखे इतर मुद्दे वाटाघाटीव्दारे सोडवले जातील. – दोन्ही देशातील गैरसमज दूर करण्यासाठी पहिल्यासारखी फ्लॅग बैठक सुरू केली जाणार आहे.

दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू राहणार
दोन्ही देशातील हॉटलाईन चर्चेमध्ये जम्मू काश्मीरमधील दहशतवादी विरोधी अभियान सुरू राहणार असून यात कोणत्याच प्रकारची सूट दिली जाणार नसल्याचे सैन्याने म्हटले आहे. सोबतच, नियंत्रन रेषेवरील ऑपरेशन पहिल्यासारखे सुरू असणार आहे.

सीजफायर संदर्भात 2003 मध्ये झाले होते अॅग्रीमेंट

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाच्या सरकाराने 2003 मध्ये नियंत्रण रेषेवर अॅग्रीमेंट केले होते. या अॅग्रीमेंटनुसार, दोन्ही देशातील सैन्य एकमेंकावर गोळीबार करणार नसल्याचे ठरले होते. त्यानुसार, दोन्ही देशांकडून तीन वर्षे पालन केले गेले. परंतु, नंतर पाकिस्तानकडून वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आले. या अॅग्रीमेंटच्या आडून पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर असणाऱ्या दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत केल्याचे भारतीय सैन्याने म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!