DGCA ने हिवाळ्यात 12,983 देशांतर्गत विमानांना दिली मंजूरी, पण ही गेल्या वर्षीपेक्षा 44% कमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.२६:  डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल
एविएशन (DGCA) ने विंटर शेड्यूलसाठी एविएशन कंपन्यांना 12,983 वीकली
डोमेस्टिक फ्लाइटची मंजूरी दिली आहे. हे शेड्यूल 25 अक्टोबरपासून पुझच्या
27 मार्चपर्यंत चालेल. उड्डाणांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास
44% कमी आहे. गेल्यावर्षी DGCA ने विंटर सीजनसाठी 23,307 देशांतर्गत
उड्डाणांना मंजूरी दिली होती.

इंडिगोला सर्वाधिक उड्डाणे मिळाली

डीजीसीएने
रविवारी सांगितले की, देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला 6,006
विमानांना परवानगी देण्यात आली आहे. तर स्पाइस जेटला 1,957 आणि गो एयरला
1,203 उड्डाणे देण्यात आली आहेत. सरकारी कंपनी एअर इंडियाला 1126 उड्डाणे
आणि त्याच्या प्रादेशिक विमान कंपनी एलायन्स एअरला 610 उड्डाणांची मान्यता
मिळाली आहे.

ही उड्डाणे
देशातील 95 विमानतळांवरून चालवली जातील. कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या
पार्श्वभूमीवर, सध्या विमान कंपन्यांना देशात जास्तीत जास्त 60% उड्डाण
संचालनास परवानगी आहे.

कोरोनामुळे एविएशन सेक्टरचे नुकसान

कोरोनामुळे
भारतात 2 महिन्यांसाठी विमान कंपनीवर बंदी घालण्यात आली होती. 25 मे रोजी
काही अनुसूचित देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू करण्यात आली. त्यावेळी विमान
कंपन्यांना फक्त 33% उड्डाणे चालवण्याची परवानगी होती. यानंतर, हळूहळू ही
संख्या सतत वाढवली जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!