
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । सातारा । मुले व पौंगडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय जंत नाशक दिन साजरा करण्यात येतो. माहे ऑक्टोबर 2022 मध्ये दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन व दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी मॉप अप दिन आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दिली.
या मोहिमेच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, डॉ. वैशाली बडदे, समाज कल्याण अधिकारी सपना घोळ.वे उपस्थित होते.
या मोहिमेत 1 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालके, 1 ली ते 12 वीतील (6 ते 19 वर्ष वयोगटातील) शाळेत जाणारी सर्व मुले-मुली व शाळेत न जाणारी सर्व मुले-मुली यांना जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. ही जंतनाशक मोहिम सर्व शाळा, महाविद्यालय, सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगवाडी केंद्रे येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी नागरिकांनी 1 ते 19 वर्ष वयोगटातील बालकांना जंतनाश गोळी द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.