दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण येथील शंकर मार्केट रोडवरील नवरात्र महोत्सव मंडळामार्फत यावर्षी 52 व्या वर्षी जगदंबा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
मंडळाचे जेष्ठ अध्यक्ष चंद्रकांत निंबाळकर यांच्या हस्ते पुजा करुन आई जगदंबेच्या मिरवणूकीला ढोल पथकाने सुरवात सुरुवात झाली. याप्रसंगी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते सुकूमार शहा बबनराव साळूंखे, मंडळाचे आधार स्तंभ मुर्तिकार बोथेकर परिवार मंडळाचे तरुण धडाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.