गोपीचंद पडळकर यांची दखल घेण्याची गरज नाही
स्थैर्य, सातारा, दि. २७ : महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीही वक्तव्य करत आहेत. ते केवळ असा प्रकार प्रसिद्धी साठी करत आहेत.
एका मुलाखतीत फडणवीस यांनी सत्तास्थापनेसाठी थेट राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती असे भाष्य शरद पवार यांनी सातारा येथे आज केले.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आपले मत व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पवार म्हणाले, लोकांनीच बाजूला केलेल्या माणसांची दखल काय घ्यावी. फडणवीस प्रसिद्धीसाठी काहीही वक्तव्य करत आहेत .सत्तास्थापनेसाठी थेट राष्ट्रवादी कडून ऑफर आली होती असेही फडणवीस म्हणतात.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या घडामोडींवर मी पुस्तक लिहिणार आहे ज्यावेळी 2019 चे विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना बरोबर येत नाही असे लक्षात आली तेव्हा भाजपला राष्ट्रवादी ची ऑफर आली. ती थेट राष्ट्रवादी म्हणजेच राष्ट्रवादी कडून, अजित पवार यांचे कडून नाही असे सांगून फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादी म्हणजे थेट राष्ट्रवादी असे स्पष्ट केले होते .मात्र राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी ही ऑफर नाकारली असा गौप्यस्फोटही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
फडणवीस यांच्या या व्यक्तव्याला शरद पवार यांनी फटकारत फडणवीस प्रसिद्धीसाठी काहीही वक्तव्य करत असल्याचे म्हटले आहे.
सध्या काहींना खूप वेळ आहे त्यांना काम नाही आणि त्यांच्याकडे सध्या काही करण्यासारखे नसल्यामुळे काही काहीतरी बोलून प्रसिद्धी मिळवायची त्याच्या पलीकडे यात काही फार वेगळे काही नाही हे सर्व प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असतात.देवेंद्र फडणवीस हे सध्या दुर्लक्षित आहेत आणि माझ्यावर टीका करून ते प्रसिद्धीचा स्टंट करत आहेत. दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महा विकास आघाडीचे सरकार भक्कम आहे असेही शरद पवार यांनी सांगितले .
आमदार पडळकर यांनी माझ्या विरोधात लोकसभा लढवली होती तिथे अनामत रक्कम जप्त झाली बारामती विधानसभा लढवली तिथेही अनामत रक्कम जप्त झाली. सांगली लोकसभा लढवली तिथेही तोच प्रकार. असे माझ्या वाचनात आले. जे बारामतीत पडले ,सांगलीत पडले आणि अशा लोकांना समाजाने ज्या त्या वेळी बाजूला केले. त्या लोकांची आपण तरी कशाला नोंद ठेवायची.
परिषदेत बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की पेट्रोल डिझेल या इंधनांची रोज दरवाढ होत आहे संपूर्ण देश संकटात असताना इतिहासात असे कधीही या आदी पाहिले नाही. केंद्र सरकार अत्यावश्यक वस्तू महाग करत आहे .इंधन दरवाढीचा परिणाम सर्व क्षेत्रावर होत असल्यामुळे सध्या टाळेबंदीत लोक गप्प आहेत. लोक सहन करतात म्हणून केंद्रशासन याचा गैरफायदा घेत आहे .
गलवान येथे सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीचे कुठेही उल्लंघन झालेले नाही. सीमावर्ती भागात घुसखोरी करत असताना केंद्र सरकार कमी पडत आहे असे दिसून येत आहे. या रस्त्यावर चीनचे सैन्य घुसखोरी करत आहे अशा घटना वारंवार घडतात .परंतु 1993 मध्ये मी संरक्षणमंत्री असताना या परिसरात दोन्ही सैन्यांना शास्त्राचा वापर करायचा नाही असा करार केला होता. नुकतीच गलवान मध्ये झालेली हाणामारीची दुर्घटना किंवा असे प्रकार यात केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या अपयश आहे असे म्हणता येणार नाही, तो आरोप हे अयोग्य ठरेल, मात्र चीनने 1962 नंतर भारताचा 36 हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतला हे सत्य आहे. आणि यापूर्वीच दुर्लक्ष करण्यात आलेले दिसत आहे त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये असे मला वाटते.
सध्या करोना लोक डाऊन मध्ये संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आलेली असताना महाराष्ट्रात विविध उद्योगात काम करणारे परराज्यातील मजूर कामगार यांच्या मनात करोना विषयाची भीती निर्माण झाली होती.त्यातच मुंबई मध्ये करोना वाढत असल्याने ही भीती अधिकच वाढली होती लोकांच्या मनातील भीती जावी आणि लोकांना करुणा सोबत जगायचे आहे याचा विश्वास निर्माण व्हावा यासाठीच मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे महाराष्ट्रातील माध्यमे फारच जागृत असल्याने मुंबई, पुणे आणि औरंगाबाद मधील करोना ची परिस्थिती अधिक ठळकपणे पुढे आली .यातूनच लोकांनी भीती घेतली असा चिमटाही खासदार पवार यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांवर काढला.
दरम्यान नागरी सहकारी बँक व मल्टीस्टेट बँका यांच्यावर रिझर्व बँकेने पूर्ण नियंत्रण आणण्याचा केंद्र शासनाचा निर्णय हा सहकार चळवळीसाठी बाधक ठरू शकतो. सहकार चळवळ संकुचित करण्याचा प्रयत्न आहे असा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला. शेती क्षेत्रात अभ्यास करणारे राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर घेणे ही माझी जबाबदारी होती ती मी पूर्ण केली आहे असेही पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना सांगितले.