मलठणच्या विकासात कधीही कमी पडणार नाही : ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२२ । फलटण । मलठण परिसराच्या विकासासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात आपण सर्व जण कार्यरत आहोत. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाल्यापासून मलठणच्या विकासासाठी कायमच आग्रही असतात. मलठणच्या विकासामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात कधीही कमी पडणार नाही, असे आश्वासन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी दिले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात व ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या जिल्हा नियोजन फंडातून फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ४ व ५ मध्ये एचटी व एलटी लाईन कामांचा शुभारंभ जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, माजी नगरसेविका सौ. मदलसा कुंभार, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!