दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । फलटण । माढा फलटण लोकसभा मतदार संघाचे पाणीदार खासदार मा. रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. आपल्या कार्यकाळात दादांनी जो कामाचा झपाटा व धडाका लावला तो धडकी भरवणाराच आहे. सतत सामाजिक प्रश्न सोडविणे . समान्य जनतेच्या कार्याची दखल घेऊन तो प्रश्न मार्गी लावणे. यात दादांचा हातखंडा आहे. लोकनेते हिंदुराव भाऊ यांची शिकवण व संस्कार या मुशीतून तयार झालेले हे युवा नेतृत्व आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीने चर्चेत आहेत. राजकारण राजकारणाच्या वेळी अन् बाकी सारा वेळ समाजातील आडअडचणी दूर करुन विकास साधणे. विकासपर्व निर्माण करणूयात दादांचा मोलाचा वाटा आहे. फलटण लोणंद रेल्वे सुरु करुन दळणवळणाला चालना दिली. पंढरपूर , बारामती रेल्वे प्रवास दादांच्या कार्यशैलीने निकाली लागला आहे. यामुळे सुलभ प्रवास , मलावहातूक , बाजारपेठा यासह चार पैसे गाठीला येणार आहेत. दादांनी प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण भागात हायमास्ट विधुत सोयसुविधा केल्या आहेत. मराठा आराक्षण प्रश्नी शिष्टमंडळासह दिल्ली येथे राष्ट्रपतींना निवेदन दिले.
लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना सेंटर द्वारे आरोग्य सेवा केली. मुस्लिम समाजप्रती रमजान ईद निमित्त दूध वाटप व सदिच्छा. कोरोना काळातही आपले कर्तव्य बजावणा-या पोलिस अधिका-यांना सॕनिटायझर वाटप करुन त्यांचे कोरोना योद्धे म्हणून कौतुक केले. कोरोना काळात व्यवसाय बंद गोरगरीब जनतेसाठी मोफत अन्नछत्र व धान्यवाटप करुन सर्वसामान्य जनतेला दादा आपलेच खासदार वाटतात. दिवाळीत किराणा मालाचे किट वाटप करुन दिवाळी पाडवा गोड करुन दादांनी सेवाव्रत सुरुच ठेवले आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरीचे विलीनकरण व्हावे म्हणून कर्मचाऱ्यांना आधार व मदत करणारे नेतृत्व .
युवकांसाठी धावून जाणारे नेतृत्व त्यांना आपलेच वाटते. व्यायामशाळा , जीम , कुस्ती , विविध प्रकाराचे क्रीडा साहित्य देऊन युवावर्गाला पाठबळ दिले आहे. अॉलंपिकवीर प्रविण जाधव यांचे घरी माता पित्यासह कृतार्थ पूर्वक सन्मान सत्कार केल्याने युवकांत चैतन्य निर्माण झाले. शहरातील व्यापारीवर्गाच्या अडचणी समजून त्यातून समन्वयाचा मार्ग काढून त्यांचा स्नेहमेळावा घेतल्याने व्यापारीवर्ग सुखावला आहे.
आळंदी देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर महाराष्ट्रातील पहिले सुसज्ज लोकनेते हिंदुराव वारकरी भवन सुरु करुन समस्त वारक-यांचे आशीर्वाद घेणारे दादा खरेच आपलेसे वाटतात. पालखी मार्ग , बाह्य रस्ता यातून वारक-यांचे लोकदैवत विठ्ठल सेवा सुलभ करुन दादांनी आध्यात्मिक क्षेत्रात नावलौकिक कमविला आहे.
लोकनेते हिंदुराव सहकारी साखर कारखान्याद्वारे बळीराजाचा ऊस वेळेत गाळप करुन उंच्चाकी भाव देऊन युवकांच्या हाताला काम देणाऱ्या दादांनी त्यांच्या कष्टाला न्याय दिला आहे. फलटण तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर दादांनी सत्ताबद्ल करुन जनतेच्या मनातील कौल जिंकला. सतत कामात व्यस्त , हसतमुख , मितभाषी , कामाचा झपाटा , विकासकामाला प्राधान्य , सर्वसामान्यांशी नाळ जोडून गट तट मतभेद विसरुन सर्वांना बरोबर घेऊन जाणा-या दादांना निरामय आयुष्य लाभो. त्यांची वर्णी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात लागणार अन् पुन्हा एखादा माढा फलटणचे नेतृत्व बहरणार.
प्रा.रवींद्र कोकरे ग्रामीण कथाकार
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण. ९४२१२१६८२१.