
स्थैर्य, फलटण : साताऱ्याची ओळख बनलेल्या प्रसिद्ध ‘देवत्व मावा केक’ची चव आता फलटणकरांनाही चाखायला मिळत आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून फलटणमध्ये या केकचे आगमन झाले आणि पहिल्याच दिवसापासून खवय्यांनी याला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. शुभारंभाच्या दिवशीच ३०० हून अधिक केकची विक्री झाल्याने फलटणकरांच्या पसंतीची खरी पोचपावती मिळाली आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला ‘देवत्व मावा केक’ आता फलटण शहरातील बुरुड गल्ली, कसबा पेठ येथील ‘भक्ती एंटरप्रायझेस’ येथे अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत केवळ साताऱ्यात मिळणारी ही प्रसिद्ध चव आपल्या शहरात उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

‘देवत्व बेकर्स’चा हा स्पेशल मावा केक प्रत्येक सेलिब्रेशनसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. केकच्या दर्जेदारपणामुळे आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीमुळे अल्पावधीतच या केकने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

‘भक्ती एंटरप्रायझेस’ने फलटणकरांसाठी ही अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. शहरातील पेंढारकर इलेक्ट्रॉनिक शेजारी, अजंठा हेअर स्टाईल समोर असलेल्या दुकानात हा केक उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी किंवा ऑर्डरसाठी ९४२१२१३६५६ आणि ९८२२९७३३४४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


