दैनिक स्थैर्य । दि. ६ ऑक्टोंबर २०२२ । फलटण । पणदरे येथील भैरवनाथ मंडळाने सामाजिक चळवळ निर्माण करुन भावी पिढीत अधिका-याबरोबरच माणूस घडविण्याचे कार्य सुरु आहे. तसेच जिद्द, चिकाटी, अध्ययन,आत्मविश्वास आणि संयम या पंचसूत्रीद्वारे निश्चित स्पर्धा परीक्षेत यश संपादन करता येते, असे प्रतिपादन पोलीस उप निरीक्षक गौरी भिसे यांनी केले.
जय तुळजा भवानी तरुण मंडळ अहिल्यानगर (पणदरे) येथे शारदीय नवरात्री व्याख्यानमालेत चंदूकाका सराफ प्रस्तुत खेळ पैठणीचा कार्यक्रमात भिसे बोलत होत्या.
यावेळी वाघर चित्रपट दिग्दर्शक निर्माता राजेंद्र बरकडे, अभिनेत्री समीक्षा सोनवलकर, प्राचार्य अनिता कदम, प्रा. अशोक देवकर, उपप्राचार्य भाऊसो पिसाळ, उद्योजक श्रीनिवास पाटील, आदर्श सरपंच सविता बरकडे, धनजंय माने, समीर भिसे, संभाजी बंडगर, पोपट तावरे, माजी मुख्याध्यापक यशवंत कोकरे, समृद्धी लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंडळाचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक यांनी भूमिका मांडताना गावागावांत वैचारिक क्रांतीच्या माध्यामातून एकोपा निर्माण करणे. वाचन, योगासने, व्याख्याने यातूनच देवीचा जागर सुरु आहे.
चंदूकाका सराफ प्रस्तुत पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या सौ. साधना विलास कोकरे, द्वितीय क्रमांकाच्या मानकरी सौ. अर्चना आबासाहेब कोकरे ठरल्या. यांना नथ, तसेच तृतीय क्रमाकांसाठी असणारी ठुशी सौ. शितल राहूल वाघमोडे यांनी पटकावली.
खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. अनिल रुपनवर यांनी बहारदार पद्धतीने केले.
मंडळाचे विश्वस्त नंदकुमार जाधव, मधुकर कोकरे, प्रदिप कोकरे, महेश झोरे, आदेश कोकरे, नितीन कोकरे, बापूराव कोकरे, भानूदास कोकरे, विश्वनाथ कोकरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. आबासाहेब कोकरे यांनी केले. प्रास्तविक प्रा. गणेश कोकरे यांनी केले. आभार सचिन कोकरे यांनी मानले.