जागतिक स्तरावर सकारात्मक निर्देशांक असूनही भारतीय बाजार अस्थिर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


निफ्टी १.०२% तर सेन्सेक्स ३७६.४२ अकांनी वधारला

स्थैर्य, मुंबई, १६ : जागतिक स्तरावर सकारात्मक निर्देशांक असूनही आज भारतीय बाजार अस्थिर राहिल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. प्रमुख निर्देशांक सकारात्मक स्थितीत बंद झाले. निफ्टीने ९९०० ची पातळी ओलांडली. निफ्टीने १.०२% किंवा १००.३० अंकांची वाढ घेत तो ९९१४.०० अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.१३% किंवा ३७६.४२ अंकांनी वाढून ३३,६०५.२२ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १३५० शेअर्स घसरले, ११९१ शेअर्सना नफा झाला तर १५० शेअर्सचे मूल्य बदलले नाही.

एचडीएफसी बँक (३.९०%), आयसीआयसीआय बँक (३.६०%), जेएसडब्ल्यू स्टील (२.८६%) आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज (२.७८%) हे आजच्या सत्रातील टॉप गेनर्स ठरले. तर टाटा मोटर्स (५.८७%), भारती इन्फ्राटेल (२.९२%), टेक महिंद्रा (२.७२%), गेल (१.९६%) आणि अॅक्सिस बँक (२.४१%) हे बाजारातील टॉप लूझर्स होते. आयटी आणि मेटल निर्देशांक वधारले तर फार्मा, एनर्जी, एफएमसीजी आणि इन्फ्रा सेक्टर्सनी आजच्या व्यापारात नकारात्मक स्थिती दर्शवली.

एलएसीवरील भारत-चीनमधील वाढत्या तणावामुळे भारतीय रुपयाने नकारात्मक स्थिती दर्शवली. आजच्या सत्रात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७६.२१ रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला.

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या ताज्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. परिणामी युरोपियन बाजारात वृद्धी दिसून आली. एफटीएसई एआयबी ३.५२% नी वाढले तर एफटीएसई १०० चे शेअर्स २.५६% नी वाढले. प्रमुख जागतिक बाजार निर्देशांक आज सकारात्मक स्थितीत बंद झाले. नॅसडॅक १.४३%, निक्केई २२५चे शेअर्स ४.८८% आणि हँगसेंगचे शअर्स २.३९% नी वाढले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!