संपत्तीप्रमाणेच संतती समृद्ध असली पाहीजे – प्रसिद्ध कवी हणमंत चांदगुडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । फलटण । पुस्तकांची संगत करून ज्ञानवंत होऊन सुंदर जगण्यासाठी चांगले संस्कार करून संपत्तीप्रमाणेच संतती समृद्ध असली पाहिजे असे पाठ्यपुस्तकातील प्रसिद्ध कवी हणमंत चांदगुडे यांनी स्पष्ट केले.

दुधेबावी ता.फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत कवी हणमंत चांदगुडे बोलत होते. यावेळी नवी मुंबईच्या शिक्षणाधिकारी अरूणा यादव, कवीविठ्ठल सोडणवर, डॉ. रविंद्र बिचुकले ,सातारा जिल्हा मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. नितीन नाळे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर , महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव नानासाहेब सोनवलकर ,फलटण तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष किरण बोळे , यांची प्रमुख उपस्थिती होती. हणमंत चांदगुडे म्हणाले,’ माणस माणसासारखी दिसतात पण माणसासारखी वागण गरजेच आहे.ज्ञानमंदिरे सदृढ होण काळाची गरज असून मुलांना मोबाईलचा वापर कमी करण्याबाबत उद्बोधीत करावे असे आवाहान चांदगुडे यांनी केले. येता भरात जोंधळा,बाप काढणी करतो, स्वतः उपाशी राहूण पोट जगाचे भरतो. अशा प्रबोधनात्मक कविता त्यांनी सादर केल्या. ग्रामीण भागात व्याख्यान माला आयोजित करण प्रेरणादायी बाब असून सातत्य ठेवल्याची बाब तर निश्चितच गौरवास्पद आहे’. असे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव नानासाहेब सोनवलकर यांनी सांगून दुधेबावीच्या व्याख्यानमालेचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. गेली २० वर्ष जिद्द व चिकाटीने प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांची प्रभोधन चळवळ दिशादर्शक आहे.’ युवकांना,शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रतिष्ठान करत असलेले प्रयत्न मोलाचे असल्याचे फलटण तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष किरण बोळे यांनी सांगितले. यावेळी जयवंत तांबे, कृषी पर्यवेक्षक आबा नाळे , सौ. स्वाती नाळे, सौ.लता नाळे, सौ.रूपाली नाचण,सौ.गिरी, विठ्ल चांगण , डॉ. युवराज एकळ,सचिन सोनवलकर , संपत सोनवलकर ,कृषी मित्र संजय सोनवलकर , संदीप ठोंबरे,कांता सोनवलकर , सुभाष सोनवलकर , भिमराव नाळे , ह.भ.प.महादेव सोनवलकर , सुधाकर चांगण,संदीप सोनवलकर ,सुमीत नाळे,लक्ष्मण सोनवलकर ,अक्षय नाळे राहूल सोनवलकर ,धिरज सोनवलकर ,अभिजीत सोनवलकर ,पोपटराव सोनवलकर , सुमीत नाळे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक भानुदास सोनवलकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. सागर कराडे , सचिन सोनवलकर यांनी केले. आभार विठ्ठल सोनवलकर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!