दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । बारामती । बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती येथील उपशिक्षक विकास जाधव यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षेत पात्र झाले आहेत.2023 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत एकूण 101257 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी केवळ 6676 विद्यार्थी या परीक्षेत पात्र झाले आहेत.या परीक्षेचा निकाल केवळ 6.59 % लागला आहे. विकास जाधव सर यांच्या या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटी चे सदस्य सदाशिव (बापूजी) सातव,विद्यालयाचे प्राचार्य श्री मोरे सर,उपप्राचार्य श्री देवडे सर,पर्यवेक्षक श्री निवास सणस,अर्जुन मलगुंडे,सुधीर जाधव तसेच सर्व शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले.