दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । फलटण । पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी सातारा जिल्हा पोलिस दलातील सेवेचा महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटत आहे. पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. आगामी काळामध्ये सुद्धा असेच कर्तव्य पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे बजावित राहतील व महाराष्ट्र पोलीस दलाचे उज्वल परंपरेत भर टाकतील, अशी खात्री असल्याचे मत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केले.
फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी पोलीस दलातील केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी सन्मानपत्र देवून उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचा सत्कार केलेला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनने काही गुन्ह्यातील आरोपींचा कौशल्य पूर्ण शोध घेवून त्यांचेकडून 2 देशी बनावटीचे पिस्टल व 1 राऊंड हस्तगत केलेले होते. या कामगिरीबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचा सन्मानपत्र देवून सत्कार केला. यावेळी सातारा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून ६ वर्षांपूर्वी पोलीस दलात निवड झाल्यानंतर प्रशिक्षण, परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर भामरागड (गडचिरोली) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उत्तम काम केल्यानंतर त्यांना सन २०१९ मध्ये फलटण (सातारा) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
तानाजी बरडे यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेवून पोलीस महासंचालकांनी त्यांना सन्मान पदक जाहीर करुन त्यांच्या कामाचा, उत्कृष्ट पोलिस सेवेचा गौरव दि. 1 मे रोजी केला आहे. गेल्या २ वर्षात फलटण उपविभागातील फलटण, खंडाळा तालुक्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याबरोबर विविध निवडणूका, यात्रा, सामाजिक कार्यक्रम येथील सुरक्षितता सांभाळली आहे. कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे योगदान राहिलेले आहे.