आरोग्य उपसंचालकांनी घेतली कवटी प्रकरणाची दखलं; ई मेल द्वारे मागितला जिल्हा शल्य चिकित्सकांना खुलासा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१४ जानेवारी २०२२ । सातारा । जिल्हा रुग्णालय परिसरात मानवी कवटी सापडल्या च्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती . या प्रकरणाची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली असून आरोग्य उपसंचालक डॉ संजोत कदम यांनी कवटी प्रकरणाचा खुलासा मागणारा ई मेल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांना पाठवला आहे.

सातारा जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीलगतच्या कचरा कुंडीमध्ये मानवी कवटी आढळल्या ची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली होती . जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांनी या प्रकरणाची पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना गंभीर दखल घेऊ आणि कारवाई करू असे सांगितले होते . मात्र प्रत्यक्ष त्यांनी घटनास्थळी भेट दिली असता कोणतीही मानवी कवटी आढळून आली नाही त्यामुळे असा कोणताही प्रकार निदर्शनास आला नसल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून केला . पण तरीही या प्रकरणात काहीतरी पाणी मुरतयं जिल्हा रुग्णालयाचा कारभारच ढिसाळ आहे . गृहराज्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली त्यामुळेच कवटी प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी . रुग्णालय प्रशासनात विलक्षण सन्नाटा होता . असे काही घडलेच नसल्याचा पवित्रा यंत्रणेने घेतला आहे . मात्र कवटी प्रकरणाचा सोशल मिडियावर प्रचंड बोभाटा झाल्या ने पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक संजोग कदम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण यांना ई मेल पाठवून या प्रकरणी खुलासा करण्याची मागणी केली आही . मात्र उपसंचालक कार्यालय सूत्रांचा दुजोरा मात्र मिळाला नाही आता डॉ चव्हाण या प्रकरणाचा काय खुलासा करणार याकडे वैद्यकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.


Back to top button
Don`t copy text!