स्थैर्य, फलटण : कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट अद्याप कमी झाले नसून शासनाच्या सूचनांचे सर्वांनी पालन करणे अत्यावश्यक आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आपल्या जिल्ह्यात धावायला सुरवात केलेली आहे. तरी त्या मध्ये काम करणारे वाहक व चालक यांची आरोग्याची प्राथमिक चाचणी दररोज किंवा प्रत्येक बसस्थानकात होणे अत्यावश्यक आहे, हेच जाणून पुणे येथील आयकर विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे व मूळचे सुरवडी, ता. फलटण येथील तुषार मोहिते यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागास तापमान तपासणीचे अत्याधुनिक अश्या पद्धतीचे थर्मामीटरचे सुमारे ३० संच, त्या सोबत विविध बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणारा पंपाचे काही संच व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सातत्याने आपले हात साफ करण्यासाठी सॅनिटायझर असे भेट म्हणून दिलेली आहेत. त्या बाबत त्यांचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामधील अधिकारी, कर्मचारी, चालक व वाहक यांनी आभार मानले.
या वेळी सातारा विभागाचे विभाग नियंत्रक पळसुले, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी भंगारे, फलटण आगाराचे आगार व्य्वस्थापक राहुल कुंभार, स्थानक प्रमुख वाडेकर, वाहतूक निरीक्षक महानवर, सहाय्यक वाहतूक नियंत्रक अहिवळे, अमोल वडगावे व समाजसेवक कुमार भोई यांची प्रमुख उपस्थिती होती.
या पूर्वी तुषार मोहिते यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपली सामाजिक बांधिलकी जपत सुरवडी व आसपासच्या गावात अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत सुरु ठेवली आहे. याच मदत कार्यातील एक भाग म्हणून तुषार मोहिते यांच्यावतीने तालुक्यातील सुरवडी, नांदल, खराडवाडी, डोंबाळवाडी, संगमनगर, धुळदेव, निरगुडी, मांडवखडक, दालवडी या गावात अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आलेले आहे.
रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता आर्सेनिकम अल्बम 30 या गोळ्या उपयुक्त आहेत. त्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती नक्की वाढेल. याचा फायदा कोरोनाच्या या लढ्यात होणार आहे. सर्व वयोगटातील व्यक्ती या गोळ्यांचे सेवन करू शकतात. शिवाय, कुणावर इतर कोणत्या रोगाचा इलाज सुरू असल्यास देखील या गोळ्या घेता येणार आहेत. रोज उपाशी पोटी तीन गोळ्या केवळ तीन दिवस घ्यावी लागतील. त्या गोळ्यांचेही वाटप आयकर उपयुक्त तुषार मोहिते यांनी तालुक्यातील विविध गावात केलेले आहे.
कोरोनापासून बचावासाठी विनाकारण घराबाहेर जाणे टाळावे. घराबाहेर जाताना मास्कचा वापर करावा. वारंवार हात स्वच्छ धुवा. घरातील 60 वर्षावरील व 15 वर्षाखालील व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. कुटुंबात किंवा शेजारी अथवा परिसरातील कोणतीही व्यक्ती कोरोना बाधीत क्षेत्रामधून आल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत प्रशाशनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही ग्रामस्थांना तुषार मोहिते यांनी केलेले आहे.