उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांची तरडगावात सांत्वनपर भेट; कै. विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना दिला धीर! “आम्ही सदैव तुमच्या पाठीशी…”


राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांनी आज तरडगाव येथे कै. विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी आ. सचिन पाटील, माजी आ. दीपक चव्हाण उपस्थित होते. वाचा सविस्तर…

स्थैर्य, फलटण, दि. ०२ फेब्रुवारी : राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार (Deputy CM Sunetra Pawar) यांनी आज फलटण तालुक्यातील तरडगाव (Taradgaon) येथे भेट दिली. येथील कै. विदीप जाधव (Late Vidip Jadhav) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी जाधव कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आणि त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.

या सांत्वनपर भेटीप्रसंगी फलटण-कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील (MLA Sachin Patil), माजी आमदार दीपकराव चव्हाण (Former MLA Deepak Chavan) आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर (Shivrupraje Khardekar) यांची प्रमुख उपस्थिती होती.

“पवार कुटुंब पाठीशी…”

जाधव कुटुंबीयांशी संवाद साधताना सुनेत्राताई पवार यांनी त्यांना धीर दिला. त्या म्हणाल्या, “या कठीण प्रसंगी पवार कुटुंब आणि पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कै. विदीप जाधव यांच्या जाण्याने कुटुंबावर जो आघात झाला आहे, त्यात आम्ही सहभागी आहोत. भविष्यातही आम्ही सदैव जाधव कुटुंबाच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही मी देते.”

अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा दौरा होता.


Back to top button
Don`t copy text!