सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सुरेशअण्णा वीर यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली


दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | “सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सुरेशअण्णा वीर यांच्या निधनानं सातारा जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार चळवळीतलं ज्येष्ठं व्यक्तिमत्वं हरपलं आहे. सातारा जिल्ह्यानं कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. देशभक्त किसन तथा आबासाहेब वीर यांच्या त्यागाचा, विचारांचा वारसा सुरेशअण्णांनी समर्थपणे पुढे नेला. त्यांचं निधन ही राज्याच्या सहकार चळवळीची मोठी हानी आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेशअण्णा वीर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


Back to top button
Don`t copy text!