गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षातून किमान १८० दिवस काम देण्याचे नियोजन करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२३ । मुंबई । गृहरक्षक दलाच्या जवानांना वर्षातून किमान १८० दिवस काम देण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत असून गृहरक्षक दल स्वयंसेवकांच्या मानधनावरील खर्चाकरिता अर्थसंकल्पामध्ये ३५० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केली होती. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गृहरक्षक दल स्वयंसेवकांच्या मानधनावरील खर्चाकरिता सन 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये रु. 350 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी रु. 297.50 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला असून प्रत्यक्षात रु. 243.31 कोटी खर्च झालेला आहे. तसेच सन 2023-24 मध्ये रु. 350 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून माहे एप्रिल 23 ते जुलै 23 पर्यंत रु. 105 कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी रु. 63.62 कोटी इतका खर्च झालेला आहे. गृहरक्षक दलाच्या मागण्यांवर शासनाने बैठका आयोजित करुन योग्य ती आवश्यक कार्यवाही करुन सर्व मागण्यांचे निराकरण केलेले आहे. बॉम्बे होमगार्ड ॲक्ट 1947 मध्ये सुधारणा अथवा बदल करणेबाबत प्रस्ताव दि. 03.04.2023 अन्वये केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!