चंद्रपूर येथील मलनि:स्सारण वाहिनी प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२२ । नागपूर । चंद्रपूर येथील मलनि:स्सारण वाहिनी व सांडपाणी पाणी प्रकल्प (एसटीपी 24 एमएलडी) या कामाच्या गैरव्यवहाराबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून त्यामध्ये काही चुका आढळून आल्यास कारवाई केली जाईल. याबाबतचा अहवाल आल्यानंतर तो तपासून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

या विषयासंदर्भात सदस्य विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, नवीन चंद्रपूर येथील मलनि:स्सारण वाहिनी व एसटीपी 24 एमएलडी या कामाबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांच्या तक्रारीबाबत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या अहवालाच्या अनुषंगाने मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी म्हाडा यांना याप्रकरणी चौकशी करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याबाबत काही कामे प्रलंबित आहेत ते पूर्ण करून घेऊन त्या कामाची गुणवत्ता व दर्जा तपासून योग्य निर्णय घेण्यात येईल. तसेच नागपूर मंडळांच्या दक्षता पथकाचा अहवाल मागविण्यात आला आहे, तो अहवाल तपासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य किशोर रोडगेवार यांनी सहभाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!