उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर


दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२३ | फलटण | राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे आज फलटण दौऱ्यावर असून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे बरड येथे दर्शन घेणार असून त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील तीन पोलीस स्टेशनचे ऑनलाईन भूमिपूजन बरड येथून करणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे बरड येथे दर्शन घेणार आहेत व बरड येथून सातारा जिल्ह्यातील तीन पोलीस स्टेशनचे ऑनलाईन भूमिपूजन करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!