उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन


दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । मुंबई । विश्वचषकावर आपले नाव कोरणाऱ्या 19 वर्षांखालील युवा महिला क्रिकेटपटूंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. आगामी काळात क्रीडाविश्वात भारत आपला वेगळा ठसा उमटवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, भारताच्या युवा महिला क्रिकेटपटूंनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत विश्वचषक पटकाविला. गेल्या काही वर्षात सर्वच क्रीडा प्रकारात आपले युवा खेळाडू उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करत असून आगामी काळात भारत क्रीडाविश्वात आणखी नाव कमावेल. युवा महिला क्रिकेटपटूंचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!


Back to top button
Don`t copy text!