दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उद्या दि. 18 रोजी सकाळी १० वाजता प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे; अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना शिंदे म्हणाले की; फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील जनतेने आता “आमदार बदलायचाय” असे ठरवले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर सचिन सुधाकर पाटील हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती असणार आहे. यासोबतच राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्यासह महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सुद्धा शिंदे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने आता आमदार बदलायचा आहे; असा ठाम निर्णय घेतला आहे. यासोबतच गत पाच वर्षांमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये गत ३० वर्षांमध्ये रखडलेली विकास कामे मार्गी लागल्यामुळे यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनता ही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत नक्की राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर उभे असलेले सचिन सुधाकर पाटील यांना घड्याळ या चिन्हावर मतदान देत प्रचंड बहुमताने ते विजयी होतील; असा विश्वास सुद्धा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.