उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज फलटण दौर्यावर; पुरपरिस्थितीचा घेणार आढावा


दैनिक स्थैर्य । दि. २९ मे २०२५ । फलटण । राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार हे आज गुरूवार दि. २९ रोजी सकाळी ६ वाजल्यापासूनच फलटण तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत.

सकाळी ६ वाजुन ३० मिनिटांनी गोखळी येथे येणार असल्याची माहिती आहे. गोखळी येथे अवकाळी पावसाच्या पुरामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेणार आहेत.

त्यानंतर फलटण तालुक्याच्या पुर्व भागाचा दौरा करत सकाळी ९ वाजुन ३० मिनिटांच्या सुमारास फलटण शहरात येणार आहेत. फलटण शहरात पाचबत्ती चौक, शनिनगर येथे पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!