उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला राज्यातील नवीन कोरोना विषाणू सद्यस्थितीसह उपाययोजनांचा आढावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । मुंबई । राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यातआरोग्य यंत्रणेने सज्ज रहावेइतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयाने काम करावेअशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. योग्य प्रकाराच्या मास्कचा वापरआरोग्य यंत्रणेकडील मनुष्यबळप्रमाणित उपचार पध्दतीविलगीकरण कालावधी आदी विषयांवर कोविड टास्कफोर्सच्या टीमसोबत उपमुख्यमंत्र्यांनी विस्तृत चर्चा केली.

राज्यातील नवीन कोरोना विषाणू सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपेमुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीसार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यासवित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरामदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्तावैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवेचे आयुक्त एन. रामास्वामी यांच्यासह दुरदृश्य प्रणालीव्दारे कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओकडॉ. शशांक जोशीडॉ. राहूल पंडीतडॉ. अजित देसाई उपस्थित होते.

राज्यातील कोरोना संसर्गाने बाधितांची संख्या वाढत आहेती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढविण्यात यावी. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावीयासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटरकोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत. उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नयेत्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावेअशा सूचना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!