गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली


स्थैर्य, मुंबई, दि. 17 : भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात सीमांचे रक्षण आणि देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांच्या सर्वोच्च त्यागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

गलवण खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहताना अजित पवार म्हणाले की, देशाची एकता आणि अखंडतेसाठी सर्व भारतीय एकजूट असून आपल्या वीर सैनिकांच्या शौर्याबद्दल, क्षमतेबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र आणि संपूर्ण देश सीमेवर लढत असलेल्या सैनिकांचा पाठीशी सर्वशक्तीनिशी भक्कमपणे उभा आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!