महान धावपटू, ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली


स्थैर्य, मुंबई, दि. १९: देशाचे महान धावपटू, ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंग यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक असून त्यांच्या निधनाने ऑलिंपिक विजेतेपदाची गुणवत्ता असलेला खेळाडू, दिलदार मनाचा, उमदा माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतीय क्रीडाक्षेत्राचा संघर्षशील, गौरवशाली अध्याय आज संपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मिल्खा सिंग यांचं 1960 च्या ऑलिंपिक स्पर्धेतलं पदक सेकंदापेक्षाही कमी फरकानं हुकलं होतं. त्या स्पर्धेत ते अनवाणी आणि सरावाशिवाय धावले होते. त्यांच्या त्या कामगिरीने भारतीयांमध्येही वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकण्याची क्षमता आहे, हा विश्वास जागवला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिल्खा सिंग यांनी केलेला संघर्ष, बजावलेली कामगिरी, मिळवलेलं यश भारतीय क्रीडाक्षेत्राला सदैव प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिल्खा सिंग यांचं स्मरण करून श्रद्धांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!