दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । मुंबई । “देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. व्यक्ती, अभिव्यक्ती, आर्थिक स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे. आजच्या स्त्रीशक्तीला मिळालेल्या स्वातंत्र्याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, सहन केलेल्या हालअपेष्टांना आहे. राज्यातील, देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार, त्यांनी रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरंच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ भारत उभा आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण करुन स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.