दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन परिसरात जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींना सक्शन यंत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
श्री.पवार यांनी यंत्राविषयी माहिती घेऊन गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन यावेळी केले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ग्रामपंचायतींना सक्शन यंत्र देण्याची योजना घेण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला ८ लक्ष ९० हजार याप्रमाणे ११ तालुक्यातील वारुळवाडी, ओतूर, चिंबळी, चऱ्होळी खु., अवसरी बु., निंबुत, भिगवण, अंथुर्णे, निराशिवतक्रार, रांजणगाव गणपती, हिंजवडी, भूगाव, कार्ला, कामशेत, इंदोरी, उरळी कांचन, लोणी काळभोर अशा 17 तसेच भोर तालुक्यातील एक याप्रमाणे १८ ग्रामपंचायतींना सक्शन यंत्र पुरविण्यात आले आहे. या यंत्राची क्षमता ३ हजार लिटर आहे.