‘सारथी’, ‘बार्टी’सह युपीएससी उत्तीर्ण उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन


दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । मुंबई । “केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातील शंभरहून अधिक तरुणांनी मिळवलेलं यश आणि त्यात ‘सारथी’ संस्थेच्या 21 तसेच ‘बार्टी’ संस्थेच्या 9 उमेदवारांचा असलेला सहभाग ही आनंदाची, अभिमानाची, उत्साह वाढवणारी बाब आहे. ‘सारथी’ आणि ‘बार्टी’च्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशानं संस्थांची उपयोगिता तसेच वाटचाल योग्य दिशेनं सुरु असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. केंद्रीय लोकसेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्राचा गौरव वाढवलेल्या सर्व उमेदवारांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या उज्ज्वल प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. या विद्यार्थ्यांच्या यशातून प्रेरणा घेऊन राज्यातील अनेक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे वळतील आणि यशस्वी होतील.”, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’ व ‘बार्टी’सह राज्यातील सर्व यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!