जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छा


 

स्थैर्य, पुणे, दि.७ : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पुण्याच्या प्रश्नांची जाण असणारे अधिकारी नवल किशोर राम यांना प्रधानमंत्री कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली आहे, ही चांगली बाब असून पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी श्री. राम प्रयत्न करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी देखील नवल किशोर राम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!