
![]() |
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने करताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी. |
स्थैर्य, सातारा, दि.१: मनिषा वाल्मीकीच्या बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, युपी सरकार बरखास्त करून उत्तर प्रदेश राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी ने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शने केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दलित समाजातील मनिषा वाल्मीकी यांच्यावर अमानुषपणे अत्याचार झाला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपींना मोकाट सोडण्यास केंद्र शासन व उत्तर प्रदेश सरकार जबाबदार आहेत. भविष्यकाळात मनीषा भूमिकांना न्याय मिळण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. मनिषा वाल्मिकी या युवतीवर सामूहिक अत्याचार झाला. तिच्याबाबत जे कौर्य घडले ते अत्यंत संतापजनक असून मानवी मन हादरवून टाकणारे असेच आहे. या घटनेचा निषेध होतोच आहे. वारंवार उत्तरप्रदेशात दलित पिछाडा समुदायावर अन्याय, अत्याचार होत आहेत. त्याबात तेथील सरकार कुचकामी ठरले आहे. कायदा सुव्यवस्थेचा पुर्णतः बोजवारा उडालेला आहे
त्यामुळे सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या अमानुष, सामुदायिकपणे अन्याय-अत्याचार करून त्यावर ते नराधम थांबलेले नाहीत. तिची जीभ कापून शरीराची विटंबना केली होती. तिच्या कुटुंबाला विचारात न घेता अंत्यविधी परस्पर ज्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली झाला त्यांच्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी चंद्रकांत खंडाईत, बाळकृष्ण देसाई,निलेश लाड,कल्पना कांबळे,श्रीरंग वाघमारे, सुनीता वाघमारे, नितीन गायकवाड आदी उपस्थित होते.