दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑगस्ट २०२२ । फलटण । संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. यामध्ये सरकारच्या वतीने प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज उभे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. वापरात नसलेले राष्ट्रीय ध्वज आपल्या जवळच्या इंडियन ऑइल पंपावर जमा करावी इंडीयन ऑइलच्या वतीने आपल्याकडील सुस्थितीतील ध्वजांचे जतन केले जाईल व जे ध्वज खराब झालेले आहेत, त्यांचे आदराने व राष्ट्रीय ध्वजाचा इतमामात पुढील प्रक्रिया करण्यात येईल, तरी आपल्या नजीकच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर आपले ध्वज जमा करावेत असे आवाहन सातारा जिल्ह्यातील इंडियन ऑइलच्या डीलरच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज उभे करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलेले होते. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय ध्वज हे प्रत्येक घरावर उभ्या करण्यात आलेले आहेत. आगामी काळामध्ये या ध्वजाचे कोणतेही गैरवापर किंवा ध्वजाचा अपमान होईल असे न घडण्यासाठी सातारा जिल्ह्यामधील इंडियन ऑईल डीलर्सने असे सर्व ध्वज हे इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर जमा करण्याचे आवाहन केले आहे.
फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांनी आपले राष्ट्रीय ध्वज हे फलटण – पुणे रोडवरील नाना पाटील चौक येथील युनिटी ऑइल अँड ट्रान्सपोर्ट सर्विसेस याठिकाणी जमा करावेत.