गिरवी ते तुळजापूर पायी वारीचे आज प्रस्थान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
गिरवी ते तुळजापूर पायी वारीचे आज, शुक्रवार, ४ ऑक्टोबर रोजी गिरवी (ता. फलटण) येथून प्रस्थान होणार असून ही वारी ११ ऑक्टोबरला तुळजापूरला पोहोचून १२ ऑक्टोबरला देवीला भोगी व अभिषेक करून दुपारी घट उठल्यानंतर वारीची समाप्ती होणार आहे.

या पायी वारीचा कार्यक्रम असा :
शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर २०२४ – गिरवीतून पहाटे ५ वा. प्रस्थान होईल. न्याहरी व मुक्काम – आर्यन मंगल कार्यालय, राजुरी पाटी, ता. फलटण.

शनिवार दि. ५ ऑक्टोबर २०२४ – दुपारी न्याहरी – नातेपुतेच्या पुढच्या बायपासला – मुक्काम – सदाशिवनगर जि. प. शाळा, सदाशिवनगर.

रविवार दि. ६ ऑक्टोबर २०२४ – दुपारी न्याहरी – खडूस उद्यान, खडूस मुक्काम – शिवशंभो कार्यालय, वेळापूर.

सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ – दुपारी न्याहरी – पालखी तळ, भेंडीशेगाव – मुक्काम – विष्णू सहस्त्रनाम सरळपाणी मठ, पंढरपूरच्या पुढे पूल पास झाल्यानंतर.

मंगळवार दि. ८ ऑक्टोबर २०२४ – दुपारी न्याहरी – चवरे वस्ती, पेनुर (कॅनेल शेजारी) – मुक्काम – जगदंबा विद्यालय, पोखरापूर.

बुधवार दि. ९ ऑक्टोबर २०२४ – दुपारी न्याहरी – सुनिल हॉटेल, लांबोटी – मुक्काम – विघ्नहर्ता कार्यालय, कोंडी (हायवेला) गणेश पेट्रोल पंपा समोर, चठऋ गोडाऊन मागे, कॅनेल.

गुरुवार दि. १० ऑक्टोबर २०२४ – दुपारी न्याहरी – चव्हाण फर्निचर (पासरेवस्ती) – मुक्काम – जिल्हा परिषद शाळा, उळेगाव (उड्डानपुलाच्या खाली) पूल शेजारी.

शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर २०२४ – दुपारी न्याहरी – पायी वारी चालू असतानाच मिळेल. मुक्काम – भाऊसार हॉल, तुळजापूर शहाजी महाद्वार.

शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ – देवीस भोगी व अभिषेक व दुपारी १२ वा. घट उठल्यानंतर होमाला बकरे व यात्रेची समाप्ती.

वारीच्या माहितीसाठी विजय कदम (मोबा. ९५२७४६८६१५), सचिन कदम (मोबा. ९९६०५३८९३४), रोहित कदम (मोबा. ९८६००९६२९५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!