दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । फलटण । शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करुन मर्यादित भाविकांसमवेत पादुका सोहळ्याची अनेक वर्षांची परंपरा जपत सद्गुरु चिले महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दि.15 जानेवारी रोजी जेऊर (पैजारवाडी) येथून प्रस्थान झाले असून हा पायी पादुका सोहळा मोर्वे येथील श्री दत्त मंदिरात बुधवार, दि.26 जानेवारी रोजी येणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, तोंडाला मास्क लावून, सॅनिटायझरचा वापर करत पालखी सोहळ्याची परंपरा जपण्यासाठी मर्यादित भाविकांसमवेत दि.15 जानेवारी रोजी माजी आमदार सुरेश साळोखे, आसुर्ले पोर्ले साखर कारखान्याचे मा.चेअरमन बाबासाहेब पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी महाराज जाधव, उत्तम बापू निगवेकर, सद्गुरु चिले महाराजमंदिर ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश पाटील खुटाळे, भैरवनाथ देवस्थानचे चेअरमन सुभाष पाटील, तानाजी पाटील, ढावरे,साठे मामा, ज्ञान तेज मासिकाचे संपादक राहुल लव्हाळे, श्री दत्त मंदिर संस्थान मोरवे चे विश्वस्त किरकिरे सर, सचिन जगताप,बाळासो कुंभार, पालखी प्रमुख शिवाजी जाधव, राजेश बरमदे, दिलीप सूर्यवंशी, जयराम पडळकर, सोमनाथ पवार इतर भाविक यांच्या उपस्थितीत जेऊर येथील मसाई देवी, श्री भैरवनाथ, श्री चिले महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक घालून पायी पादुका सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले.
दि.26 जानेवारी रोजी श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्वे येथे पायी पादुका सोहळा येत आहे असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान, मोर्वे यांच्यावतीने करण्यात आले आहे.