ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि कतार येथील किंग्स गॅस कंपनी यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य कराराच्या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, डॉ. पी. अनबलगन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, किंग्स गॅस प्रा.लि.चे व्यवस्थापक मोहंमद कुरेशी,  समीर वहाबे, समीर हमीदे उपस्थित होते.

लिक्विड नॅचरल गॅस हा जीवाश्म इंधनाला  एक उत्तम पर्याय असून  येत्या काळात  हा गॅस अधिक उपयुक्त आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे. किंग्स गॅस प्रा.लि. हे राज्य शासनाच्या सहकार्याने राज्यात लिक्विड नॅचरल गॅसची निर्मिती, उपलब्धता आणि वापर वाढवण्यासाठी काम करणार आहे. दळणवळण, औद्योगिक क्षेत्रासाठी, सदृढ आर्थिक विकासासोबतच इतर इंधन वापरामुळे निर्माण होणाऱ्या कार्बनचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी देखील लिक्विड नॅचरल गॅस सहाय्यक आहे.त्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभागाने हा सामंजस्य करार केला आहे.


Back to top button
Don`t copy text!