पुणे – फलटण व लोणंद – फलटण दरम्यान डेमू रेल्वे सेवा पूर्ववत


दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । फलटण । रेल्वे प्रशासनाने पुणे- फलटण व लोणंद – फलटण दरम्यान डेमू रेल्वे सेवा गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी पासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

1. गाडी क्रमांक 01535 पुणे येथून 05.50 वाजता सुटेल व 09.35 वाजता फलटणला पोहोचेल व परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01536 फलटण येथून 18.00 वाजता सुटेल व पुणे येथे 21.35 वाजता पोहोचेल. ही गाडी सासवड रोड, जेजुरी, नीरा, लोणंद व सुरवडी स्टेशनवर थांबेल.

2. गाडी क्रमांक 01538 फलटण येथून 11.00 वाजता सुटेल व 12.20 वाजता लोणंदला पोहोचेल व परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01537 लोणंद येथून 15.00 वाजता सुटेल व फलटण येथे 16.20 वाजता पोहोचेल. ही गाडी सुरवडी स्टेशनवर थांबेल.

दहा कोच असलेल्या या डेमू गाड्या रविवार व्यतिरिक्त प्रतिदिन सेवेत असतील.

प्रवाशांना विनंती आहे की कोरोना महामारीमुळे रेल्वे प्रवासाकरीता जारी मार्गदर्शक सूचना जसे प्रवासादरम्यान मास्क वापरणे, सोशल डिस्टेंसिंग, सेनिटाइजरचा उपयोग आदींचे पालन करावे.


Back to top button
Don`t copy text!