ललगुण येथे कृषीदूतांकडून स्वच्छ दूध उत्पादनाविषयी प्रात्यक्षिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२४ | फलटण |
खटाव तालुक्यातील ललगुण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांअतर्गत कृषीदूतांनी शेतकर्‍यांना स्वच्छ दूध उत्पादनाविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले.

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी वर्ग दूध व्यवसाय प्रामुख्याने करतात. यावेळी दूध उत्पादन घेताना स्वच्छतेसंबंधी आवश्यकता आणि महत्व याबदल जागरुकता केली. यावेळी दत्तात्रय घाडगे यांच्या गोठ्यात प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.


Back to top button
Don`t copy text!