दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२४ | फलटण |
कृषी महाविद्यालय, फलटणच्या कृषीकन्या मयुरी शिंदे, सायली शिंदे, प्रणोती मदने, राजनंदिनी जगदाळे, प्रणाली ओवाळ, सानिया मुलाणी, स्वामिनी डोंगरे यांनी ढवळ (ता. फलटण) येथे दूध उत्पादनावर प्रात्यक्षिक केले. स्वच्छ दूध उत्पादनाचे महत्त्व, फायदे सांगत शेतकर्यांमध्ये जागरुकता निर्माण केली. या प्रात्यक्षिकाचा सर्व शेतकर्यांनी वापर करावा, यासंदर्भात सर्व कृषीकन्यांनी सल्ला दिला.
यावेळी ग्रामस्थ संजय लोखंडे, दयानंद किसन लोखंडे, शेखर सोनवलकर, भरत तांबे, सौरभ लोखंडे, संगीता लोखंडे, रुक्मिणी शिंदे, पांडुरंग शिंदे, सोमनाथ शिंदे, स्वप्निल लोखंडे इ. शेतकरी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नीतीशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम व प्रो. अडत सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पाडले गेले.