दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, फलटण येथील आठव्या सत्रातील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत वाठार निंबाळकर येथे बासुंदी बनविण्यावर येथील महिलांना प्रात्यक्षिक दिले.
यामध्ये बासुंदी कशी तयार करावी, किती दुधासाठी किती साखर वापरावी आणि बासुंदी तयार करताना काय काय करावे, याबाबत संपूर्ण माहिती कृषीकन्यांनी महिलांना दिली.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीशा पंडित व प्रा. नगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या राधिका शिंदे, ऐश्वर्या शिंदे, वैष्णवी रणवरे, मानसी महाडिक, सानिका झांजुर्णे, ज्ञानेश्वरी धायगुडे यांनी हा कार्यक्रम पार पाडला.