सोनवडी (खुर्द) येथे कृषिदूतांनी दिले शून्य उर्जेवर आधारित शीतकक्षाचे प्रात्यक्षिक


दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षांतील कृषीदूतांमार्फत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकर्‍यांना भाजीपाला जास्त काळ टिकवण्यासाठी शून्य उर्जेवर आधारित शीतकक्ष कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.

शून्य उर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणार्‍या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीतकक्षाचा वापर फळांचा व फळभाज्यांचा साठवण कालावधी वाढवण्यासाठी करता येतो. त्यामुळे फळे जास्त काळ टिकतात व त्यांची नासाडी टाळता येते. शीतगृहाची उभारणी अत्यंत महागडी असून ती सर्वसामान्य शेतकर्‍याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसते. त्यासाठी शून्य उर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणे फायद्याचे ठरते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिषा पंडीत मॅडम, प्रा. रश्मी नायकवडी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत केदार घनवट, भूषण गायकवाड, शुभम कोकणे, अंगद कागणे, शुभम आडके, दुर्वेश बोराटे, गणेश कोळेकर या कृषीदूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.


Back to top button
Don`t copy text!