धुळदेव येथे कृषीकन्यांनी दिले ‘वी’ आकाराच्या खड्ड्यातून मातीचे नमुना गोळा करण्याचे प्रात्यक्षिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत ‘वी’ आकाराच्या खड्ड्यातून मातीचे नमुना गोळा करण्याचे प्रात्यक्षिक दिले.

कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी शेतकर्‍यांना मृदा चाचणीसाठी मातीचे नमुने गोळा करण्याची शास्त्रीय पद्धत प्रत्यक्ष करून दाखवली. त्यासाठी त्यांनी मोकळ्या जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी खोरे व खुरपे यांच्या साह्याने ‘वी’ आकाराचा खड्डा खणून खड्ड्याच्या अंतरकडांवरील मातीचे नमुने गोळा केले.

कृषीकन्यांनी या गोळा केलेल्या मातीच्या नमुन्यांची चाचणी करण्याची शास्त्रीय पद्धतही शेतकर्‍यांना सांगितली. मातीचे नमुने घेऊन त्याची चाचणी करण्याचे फायदे जसे की, मातीची पोषक द्रव्यांची टक्केवारी समजते, मातीचे इतर गुणधर्म जसे की, मातीची आम्लता, मातीची विद्युत चलकता इत्यादींची माहितीही सविस्तर शेतकर्‍यांना दिली. शेतकर्‍यांनी या प्रात्यक्षिकास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!