दैनिक स्थैर्य । दि. १३ जानेवारी २०२३ । फलटण । फलटण तालुक्यातील आरडगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीदुतांनी ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आरडगाव येथील शेतकऱ्यांना बागायती पिकांसाठी खड्डे खोदणे आणि भरणे या विषयावर सविस्तर माहिती दिली व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच यावेळी Imy Im चा खड्डा खोदून त्यात ऊसाचा कचरा, शेणखत, सुपर फोस्फेट व सुपीक माती भरून त्यात गावातील शेतकयांच्या हस्ते आंब्याच्या रोपट्याचे वृक्षारोपण केले.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्रा. एन. एस. ढालपे, प्रा. एस. वाय. लागे, प्रा. एन. ए. पंडित आणि विषय शिक्षक मार्गदर्शक प्रा. एस. एस. अडत यांचे कृषीइत ऋषकिश पावसे, तेजस चव्हाण विशाल पवार, प्रतीक मुंडे प्रतीक म्हस्के, आदित्य रातवान, पवार व राजवर्धन पाटिल यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.