दैनिक स्थैर्य | दि. ३ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषिदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४/२५ कार्यक्रमाअंतर्गत मुरुम, ता. फलटण, जि. सातारा येथे ‘एकात्मिक तण व्यवस्थापन’ कसे करावे व त्याच्या पद्धती आणि महत्त्व याबद्दल शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
तण व्यवस्थापन केल्यामुळे पिकास होणारे फायदे सांगत कमीतकमी खर्चात व कमीतकमी वेळेत तण व्यवस्थापन कसे करावे आणि त्याची सोपी पद्धत देखील प्रत्यक्ष करून दाखवली. रासायनिक पद्धतीचा वापर करून उसाच्या पिकामध्ये २,४-डी या रासायनिक तणनाशकाची फवारणी करण्यात आली.
यावेळी गावातील काही शेतकरी उपस्थित होते. तसेच मुरुम गावातील शेतकर्यांनी कृषी महाविद्यालय, फलटणच्या कृषीदूतांचे आभार व्यक्त केले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नीतिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम व प्रा. गणेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत भोंग अनिल, राठोड आराज, भोंग राहुल, भोसले विश्वजीत, भोसले सिद्धांत, पटेल खलील, कुंभार अनिकेत, गाढवे तेजस यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.