दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२१ । सातारा । ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा निषेधार्थ राज्य व केंद्र सरकारचा जाहीर निषेध वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आला .आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाच संपन्न झाल्यानंतर समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. यावेळी महासचिव शरद गाडे व गणेश भिसे,सचिव सुधाकर काकडे,गणेश कारंडे आदी जिल्हा पदाधिकारी , सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी सदस्य , महिला आघाडी, युवक आघाडी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्रात २ निवडणुका न घेता सध्या सुरू असलेल्या १०५ नगरपंचायत व नगरपरिषदेच्या जो कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.तो रद्द करून एकच निवडणूक कार्यक्रम हाती घ्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा महासचिव गणेश भिसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणांनी सुरुवात केली.सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सहभाग घेतल्याने परिसर दणाणून सोडला. यावेळी संघटक सुहास पुजारी, उपाध्यक्ष फारुख पटणी आदी कार्यकर्त्यांसह राष्ट्रोत्सव संयोजन समितीतर्फे ऍड.विलास वहागावकर, अनिल वीर व त्यांचे सहकारी,वंचितचे प्रमोद क्षीरसागर, किसन गुरव, अशोक दीक्षित आदी पदाधिकारी- कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.