
स्थैर्य, सातारा, दि. 1 : भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आमदार शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखाली दूध दराच्या अनुदानासाठी सातार्यात शनिवारी निदर्शनं करण्यात आली. शेती पूरक व्यवसायांना अनुदान मिळावे या मागणीसाठी भाजप समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
सातारा शहरात शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, सातारा नगरपालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, विट्ठल बलशेटवार, नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, सौ. प्राची शहाणे, डॅनियल फरांदे, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, माजी नगरसेवक किशोर पंडित, उपाध्यक्ष अप्पा कोरे, सौ. मनीषा पांडे, चंदन घोडके, चिटणीस रवी आपटे, संतोष प्रभुणे, लक्ष्मण चव्हाण, सौ. वैशाली टंकसाळे, माजी शहराध्यक्ष सुनील काळेकर, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. रीना भणगे, जिल्हा पदाधिकारी सौ. सुनिशा शहा, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, युवती मोर्चा अध्यक्ष दीपिका झाड, वैद्यकीय आघाडी जिल्हा पदाधिकारी डॉ. उत्कर्ष रेपाळ, अनु. जाती मोर्चा जिल्हा पदाधिकारी शैलेंद्र कांबळे, जेष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शहाणे, युवा मोर्चाचे अमोल कांबळे, किशोर गालफाडे, धीरज घाडगे, व्यापारी आघाडीचे जिल्हा पदाधिकारी डॉ. सचिन साळुंखे, प्रशांत जोशी, औद्योगिक आघाडी अध्यक्ष रोहित साने, कामगार आघाडी अध्यक्ष तानाजी भणगे, अविनाश पवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक, शेतकरी उपस्थित होते.
सातारा शहरात श्री. छ. शिवाजी महाराज सर्कल आणि मोतीचौक या दोन्ही ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी उपाशी, ठाकरे सरकार तुपाशी, दूध उत्पादक शेतकर्यांना दरवाढ मिळालीच पाहिजे, दूध उत्पादक शेतकर्यांना दुधावर अनुदान, दुधाला दरवाढ व अनुदान, हे अनुदान थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा व्हावे, आदी मागण्या आंदोलनादरम्यान करताना शेतकरी उपाशी सरकार तुपाशी, किसान के सन्मान मे भाजपा मैदान मे इ घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.