दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदणे आणि भरणे यावर प्रात्यक्षिक दिले. प्रगतशील शेतकरीदत्तात्रय पंढरीनाथ भोईटे यांच्या शेतात हे प्रात्यक्षिक देण्यात आले.
यामध्ये आंबा पीक लागवडीसाठी योग्य पद्धतीने खड्डा कसा घ्यावा, खड्डा किती प्रमाणात खोल असावा, त्याचा आकार कसा असावा, तसेच तो कोणते घटक किती प्रमाणात वापरून भरून घ्यावा व नंतर रोप लावावे, या सर्व बाबींचा पिकाच्या निरोगी वाढीसाठी कसा फायदा होतो, हे सांगण्यात आले व त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.
खड्डा भरताना प्रथम कार्बारील पावडर १०० ग्रॅम पसरवून टाकण्यात आली. नंतर पहिल्या थराला त्यामध्ये उसाची पाचट टाकण्यात आली. दुसर्या थराला कुजलेले शेणखत २५ किलो व २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकण्यात आले. शेवटी रानातील माती टाकून त्यात आंब्याचे रोप लावण्यात आले. यावेळी शेतमालकदत्तात्रय भोईटे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भोईटे, शेतकरी राजेंद्र भोईटे, नवनाथ भोईटे, हणमंत भोईटे, प्रदीप भोईटे, अमोल भोईटे, आकाश भोईटे आदी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. नीलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितीशा पंडित मॅडम व प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली कु. प्रतिक्षा लोणकर, अनुजा नाळे, मयुरी सावंत, संजना वाघमारे, अर्पिता पावणे, शारदा बोराटे, भाग्यश्री बोडके, साक्षी अभंग यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.